अध्यात्म हा काही ज्येष्ठा साठी नवा विषय नाही .अध्यात्म जाणत नाही असा ज्येष्ठ शोधून ही सापडणार नाही .अध्यात्माची ओढ ही उपजतच असते .जीवनाची वाटचाल करताना अनेक टप्प्यानची अडथळ्यांची शर्यत ओलांडावी लागते .सारेच टप्पे सुखाचे असतात असे
,तर सुख कणभर व दुःख मणभर वाट्यास येत असते .दुःखाची चाहूल लागताच माणूस आपसूकच अध्यात्माकडे ओढला जातो .अध्यात्म म्हणजे एक अज्ञात शक्ती. ती ज्ञात व्हावी म्हणून आपला अट्टाहास म्हणजेच अध्यात्म होय .
वाटा अध्यात्म्याच्या
अध्यात्म्याच्या पहिला टप्प्यात आपण ह्या जगात आल्या पासूनच आपल्या आजी आजोबा ,आई वडील वगैरे नातेवाईकांकडून रामायण ,महाभारत ,आटपाट नगर ,राजा राणी,सिंहासन बत्तीसी ,वेताळ-विक्रम सारख्या कथा ऐकत आलेलो असतो . सृष्ट व दृष्ट शक्तिचा संघर्ष व त्यातून सत्याचा अंतिम विजय आपल्या मनाची पकड घेतो . कथा ऐकता ऐकता कथा संग्रह ,ग्रंथ यांचेही वाचन आपले चालूच असते . शिक्षणाच्या विविध पातळ्या वर मातृभाषा ,राज्यभाषा व इतर अनेक भाषांचा हीं आपण अभ्यास करीत असतो .श्रवण, कथन,वाचन या बरोबरच आता आपल्या मदतीस आकाशवाणी ,दूरदर्शन आणि आतातर मालिका व चित्रपट ही आपल्या ज्ञानसागरात भर टाकीतच असतात.
पर्यटनातून अध्यात्म,मनोरंजनातून पर्यटन , पर्यटनात तीर्थक्षेत्रे ,बारा ज्योतिर्लिंगे , अष्टविनायक ,चार धाम ,देवी देवता यांच्या भेटी व दर्शनातून आपण अध्यात्म कळत न कळत शिकत असतो .अध्यात्माचा हा प्रवाह अविरत चालू असतो.कीर्तन, भजन व प्रवचन ,अभंग,गाथा, गीता , ज्ञानेश्वरी , उपनिष दे ,रामायण सारखी पुस्तके मनाचा ताबा घेतात.आपला दिनक्रम ,स्नान, संध्या ,देवपूजा यांनी व्यापून जातो .
एव्हाना तारुण्याची चाहूल लागलेली असते,ग्रहस्थाश्रमाच्या ह्या टप्प्यात ज्ञानार्जन मागे पडते व अर्थार्जनाचा प्रवास सुरु होतो.मात्र ह्या काळात अध्यात्म ढेपाळते,मंदावते. आता आपण प्रपंच,मुलांचे संगोपन ,आई वडिलांची सेवा यात गुंतून पडतो .तरी हीं देव देवतांचा विसर पडतो असे मात्र होत नाही .सॅम वयस्क ,सॅम विचारी समवेत हा प्रवास अविरत मार्गक्रमण करीत असतो .
I
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा