शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

टीपू मेरा

टीपू म्हटले की आपल्याला कुत्रा दिसू लागतो पण तसे काही नाही तो माझा नातू आहेमला तसे नातूपण हा जरा आगला आणि वेगला ही.वेग़ला अशा अर्थाने की सहा पैकी काही गोरे तर काही निमगोरे परन्तु टीपू काला रंग घेउन आलेलाआणि आगला असा की त्याच्या अंगी नाना कला आहेत. तो सर्वाना हवा हवासा वाटतोगहरी जसा आवडतो शाळेत ही शिक्स्कानां आवडतो

सोमवार, २५ मे, २०१५

निवृत्ताचे मनोगतं

 

                                  मी 
बाबूलाल केदू आहिरे. मौजे  पाटणे येथील  महात्मा फूले जेष्ट नागरिक सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. समाजा साठी काहीतरी करण्याची इच्छा होती . त्या प्रेरणेतूनच जेष्ठ नागरीक संस्थेचा जन्म झाला.  आमच्या गावी बहुतेक फूलमाली समाज आहे.  समाजाचा शेतीकडे जास्त ओढा आहे.ऐहिक  जीवनात जन्म आणि मृत्यु ह्या जशा निश्चित घटना आहेत तशाच शासकीय जीवनात  नोकरीची आरंभीची तारीख व सेवा निवृत्ती ची तारीख निश्चित झालेल्या असतात. . शासकिय सेवक  नोकरीच्या आरंभीच्या दिवसा पासूनच आपल्या निवृत्तीच्या तारखे कडे वाटचाल करू लागतो  या कालखडांतच त्याचे आत्मचिंतनही सुरूच असते. जीवनाचा ताळेबंद मांडता  मांडता व संसाराचा गाडा ओढता  ओढता निरोप समारंभाची तारीख जेव्हा येते तेव्हा भले मोठे प्रश्न चिन्ह - पुढे काय ?
                               मी तरी त्याला कसा अपवाद असणार आज सेवा निवृत्त होऊन मला ३ वर्षे लोटलित.   .आयुश्याचे दिवस अन वर्षं दिवसा दिवसाला घटत आहे. त्वा शेवटच्या दिवसाची वाटचाल चालू आहे . दैनंदिन कर्तव्ये तर संपत नाहीतच मात्र नवी नवी आव्हाने  येतच असतात. अशा ह्या कातरवेळी विचारांचे मृगावर्त कधी कधी मनाला अस्वस्थ करते.  सिंहावलोकन करताना ; मागे वळून पहाताना जीवनाचा चालत चित्रपट झर झर सरकत रहातो. मनाची गती काही थाबंता थाबंत नाही .
                              मालेगाव तालुक्यातील गिरणाच्या उजव्या तीरावर वसलेला पाटणे  हा माझा गाव. प्रत्येकाला असावा तसा मला ही माझ्या गावाचा अभिमान.आहेच . चांदवड तालुक्यातून पठारावरून  खाली घरंगळणारी परसूल जेथे गिरणाला भेटते तेथे मोठा महादेव हे जागृत देवस्थान  . गुप्तेश्वर म्हणुन ही  त्याची पंचक्रोशित  ओळख . गावाला  वेढणारा आणि सरक्षना साठी  बहुधा  बांधलेला सोळाव्या शतकातल्या दगडी कोटाच्या खूणा सर्वत्र आढळतात . त्याला दोन वेशी पैकी एक नैऋतेला तर दुसरी इशान्येला. त्याही आता शेवटच्या घटका मोजत आहेत.
                                         गाव बागाईत . ब्रिटिश काळात बांधलेला गिरणा वरील बंधारा . त्याचा   डावां  पाट दाभाडी  ला तर उजवा पाट पाटण्याला .  फड बागाईत चा वारसा . ब्रिटिशांनी त्याला सेकंड  क्लास बागाइत  असे  गोडंस नाव दिले. समाजवादी  देशात सामुहिक शेतीचा जो प्रयोग राबविला तो ह्या गावाने ही असा राबवलेला . मी पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय पाटणे येथे सन १९७४ मध्ये मुख्याध्यापक असताना  मुंबई  विद्यापीठाचे   अर्थशास्र प्रमुख  मा. स ह . देशपांडे यांनी याची  दखल तर घेतलीच परंतु ह्या विषयावर प्रबंध लिहिण्या साठी मार्गदर्शन ही केले.
                                        माझे प्राथमिक शिक्षण इयत्ता ६ वी  पर्यंत पाटणे येथील प्राथमिक  शाळेत   झाले ते वर्षे १९५५ असावे. दाभाडी चे रा. पु. निकम ;हिंगे गुरुजी ;वाक्याचे  मो. ता. पाटील यांनी छडी लागे छम छम व विद्या येई घम्  घम  चे धडे तर दिलेच परंतु केलेले मार्गदर्शन आज ही तेवढेच मोलाचे वाटत आहे.  जीवनात असे गुरुजन लाभणे दुर्मिळच .  आज शिक्शण क्षेत्रात ३३ वर्षे सेवा करुन ही तसे गुरु आपण होऊ शकलो नाहीत याची खंत वाटते.  इयत्ता ७ वी ला सतत दोन वर्षे शून्य टक्के निकाल पाटणे येथे लागल्याने वडिलांनी मला चांदवड येथे पाठविले.  तालुक्याचे ठिकाण असून ही चांदवड . तेव्हा खेडेच वाटे.  मुलांची मराठी प्राथमिक शाळा  तेव्हा रंग महालात भरावयाची . आज चांदवड च्या राजकीय व सामाजीक जीवनात प्रकर्षाने नेतृत्व करणारे श्री अशोक व्यवहारे माझे वर्गमित्र होते . तेव्हा चांदवड ला सातवीचे परिक्षा केंद्र ही नव्हते . परीक्षा देणे साठी मनमाड ला जावे लागले होते . त्या सहा सात महिन्याच्या कालावधीत मी चंद्रेश्वरचा  डोंगर कोंबडवाडीचा परिसर व आसमंतातील  सर्व प्रेक्षणिय स्थळे पाहून घेतली .  पहीले प्रेमाचे धडे चांदवड नेच येथे मज कडून  गिरउनं घेतले. पण माझे पहीले प्रेम काही रुजले नाही .
                                                      गावी व जवळपास शिक्षनाची सोय नसल्याने मला एका नातेवाइका करवी मी न्यू इग्लिश स्कूल नांदगाव ला आठवित प्रवेश घेतला . शाळा नवीन  गाव ही नवीनच. रेल्वे स्टेशन शिवाय प्रेक्षनीय असे काही नव्हते .  पण नांदगाव ही मला चांगलेच भांवले. सय्यद चिराग .नामदेव महाजन ;  राजा चव्हान आणि ए. ए. शेख सारखे सवंगडी लाभले. ज्यांचे आज ही मला ऋण व भूषणं ही वाटते .
                                                            एस .एस सी . परीक्षा पास होताच मला इंजिनियरिग कडे जावयाचे असल्याने मी पुणे येथील वाडीया कॉलेजला प्रवेश घेतला .  ते वर्षे असावे १९५९/६० चे . आमचे कोलेज सर्वच बाबतीत नावाजलेले. . अनेक विध्यार्थी  विदेशातून आलेले. माझा होस्तेल पार्टनर टांगानिका हून आलेला . स्मार्ट आणि दिलदार ही तसाच. सारे काही विदेशी रंग ढंगाचे . आम्ही खेड्यातून आलेलॊ. जुळउन  घेणे  तसे अवघडच होते .पुणे शिक्षणाचे  माहेर घर हे जरी खरे असले तरी आम्हाला मात्र ते काही रुजले नाही . आमची दांडी उडाली ती उडालीच .  मी पुणे सोडले ते कायमचेच .  ते वर्ष गेलेच .                    
                                                                   त्या नंतर मी व शाहनवाझ  खान ने इंदोर  गाठबी.एड ले. तेथे नूतन उच्चतर  महाविध्यालय मध्ये एक्स्टरनल विध्यार्थी म्हनून प्रवेश घेतला. सहा महिने तेथेच अभ्यास केला . इंदोर; उज्जैन ;देवास ; भोपाळ ही शहरे पाहून घेतली .  इंटर उत्तीर्ण होताच मालेगावी एस . वाय . व टी.वाय. केले व पदवी पदरात पाडून घेतली . तेव्हा नोकरी घरी चालून येत होती . मी ही खाकुर्डी येथील सेवा इंग्लिश स्कूल  मध्ये रुजू झालो. इंजिनियर नाही होता आले म्हणून मास्तर झालो. मागता येई ना भिक म्हणून मास्तरकी शिक ह्या म्हणीची खरी प्रचिती आली ती असी .
                                            एकच  वर्षे ते १९६५ चे. आयुष्याला वळण देणारे . ख-या अर्थाचा टर्निंग  पोइण्ट .  मुख्याध्यापक  श्री . सोनवणे यांनी मला मंत्र दिला  बी एड . ला जाण्याचा .  तो मी स्विकारला. पर्येटनाची आवड मला स्वस्थ बसू देईना . म्हणून मी परिसरातील विद्यालय टाळून कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला . एस. एम. टी. टी . कोलेज ला मी प्रवेश घेतला. येथे मात्र मी पुणे ; इंदोर चा अनुभव लक्षात घेउन माझा जन्मजात खेडवळ मुखवटा टाकून दिला. व   डयाशिंग  स्टूडंट  म्हणून विविध  कार्यक्रमात सहभाग घेउ लागलो.  नाशिक  जिल्ह्याचा मी एकमेव विद्यार्थी  होतो.  क्लास कौन्सील  म्हणून मी निवडून आलो. य़ा शिवाय  शिवाजी विध्यापिठात  अकेडेमिक कौन्सिल  वर ही विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली .त्यामुळे  अनेक विध्यार्थी प्रतिनिधी सह ओळखी झाल्यात. अनेक मित्र मिळाले.  एवड्यावरच  माझी घोडदौड  थांबली नाही न तर कोलेजचा आदर्श विध्यार्थी म्हणून ही मला गौरविण्यात आले । त्या वर्षी प्रख्यात  कांदबरिकार   वि. स. खांडेकर याचे कडे अनेकदा जाण्याचा योग प्राप्त झाला . एवढेच नव्हे तर त्यांच्या एक कन्या सहाध्यायी तर एक कन्या प्राध्यापिका होत्या . शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण  शैक्षणिक प्रयोगांची देशात व विदेशातही प्रशिद्दी पावलेले मा. वि. वि. चिपळूणकर  आमचे प्राचार्य होते.
                                                                                         शिक्षण  घेता घेता भटकंतीचा  माझा छद  मी कमी होउ दिला नाही . क-हाडचा  प्रिती  संगम ;किर्लोस्करचा काचेचा कारखाना ;शिवाजी विध्यापीठ ; पन्हाळा ;ज्योतिबा ; राधानगरी ;बाहुबली ;शिराळा ; महाबळेस्वर ; पाचगणी ;वाई ; प्रतापगड;  ही सारी ख्यातनाम ठिकाणे  मी पाहून घेतली . शक्तिपीठ अंबाबाई  व रंकाळा रविवारचा विरुंगळा  ठरलेला
                                                                               बी. एड. होताच गावी .नुकत्याच सुरू झालेल्या विध्यालयात इयत्ता नववीच्या नवीनच वर्गांसाठी बी.एड. शिक्षकाची गरज होती . त्यामुळे मला सरळ मुख्याध्यापक म्हणून नेमणूक देण्यात आली . संस्थेचे चेअरमन कै . यां. ना.  जांधव. हरहुन्नरी व्यक्तिमत्व . आमचे चांगलेच सुत जमले. त्यामुळे त्यांनी सन १९७४ मध्ये संगमेश्वर च्या लोकमान्य विद्द्यालयात माझी बदली करून घेतली . मालेगावच्या मोठया  विद्यालयात मी नाराजच  होतो पण नाईलज   होता. त्याचा फायदा ही मला मिळाला. दादा  म्हणजे राष्ट्रीय ख्याती पावलेले . त्यामुळे  एस. एम. जोशी ; ग.प्र. प्रधान. ;निहालभाई . बाबा आमटे ; बाबा आढाव ;छगन भुजबळ ;प्रमिला दंडवते ; मधू दंडवते ;शंकरराव चव्हाण ;सदानंद वर्दे या सारख्या विभूतींचा सहवास लाभला.
                                                         याच बरोबर माझ्यातील राजकीय व सामाजिक तृष्णा दादांनी हेरली  व जेथे जेथे शक्ये होते त्यांनी मला पुढे करण्यात मागेपुढे पाहिले नाही . याच काळात गावात नवे व उमदे नेतृत्व म्हणून रामचंद्र बापू यांनी मला साथ दिली . मग काय  ? आम्ही सोसायटी ;पंचायत ;गिरणा कारखाना ; शेतकरी संघ ; दुध संघ यात हिरीरीने सहभाग घेतला. साहजिकच त्यामुळे ग्यानदेवदादा देवरे ; पवार वकील; पंडितराव  भाऊ ; पुष्पाताई हिरे सारख्या मान्यवराशी अल्प का होईना पण सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाली . सामाजिक ऋणानुबंध त्यामुळेच मला जोपासता आले.
                                                             या प्रदीर्घ प्रवासात विद्यालय व प्रशासन यात कुठे ही दुर्लक्ष्ये होणार नाही याची सतत मी काळजी घेत आलो. शाळा व संस्था यांच्या प्रगतीस कोठेही बाधा येऊ दिली नाही .विद्द्यार्थ्याचे  कल्याण व शिक्षकांचे प्रश्न सतत जोपासत राहिलो.  टी ड़ी एफ शी शेवट पर्यंत बांधिलकी राहिली ती आज  पावेतो. नोकरीच्या कालखंडात  समाज व गाव या पासून मी तसूभर ही दूर झालो नाही                                                                      




सोमवार, १८ मे, २०१५

nagar-nashik: Platinum Website : सुस्वागतम

nagar-nashik: Platinum Website : सुस्वागतम: Platinum Website : सुस्वागतम : जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत

B.K.AHIRE: B.K.AHIRE: महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्...

B.K.AHIRE: B.K.AHIRE: महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्...: B.K.AHIRE: महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था पाटने : "महात्मा फुले जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्था पाटने चे सभासद रंग पंचमी खेलत आ...

B.K.AHIRE: Mahatma Fule Jeshth Nagarik Sevabhavee sanstha Pat...

B.K.AHIRE: Mahatma Fule Jeshth Nagarik Sevabhavee sanstha Pat...

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

अध्यात्म आणि जीवन

अध्यात्म हा काही ज्येष्ठा साठी नवा विषय नाही .अध्यात्म जाणत नाही असा ज्येष्ठ शोधून ही  सापडणार नाही .अध्यात्माची ओढ ही उपजतच असते .जीवनाची वाटचाल करताना अनेक  टप्प्यानची अडथळ्यांची शर्यत ओलांडावी लागते .सारेच टप्पे सुखाचे असतात असे 

 ,तर सुख कणभर व दुःख मणभर वाट्यास येत असते .दुःखाची चाहूल लागताच माणूस आपसूकच अध्यात्माकडे ओढला जातो .अध्यात्म म्हणजे एक अज्ञात शक्ती. ती ज्ञात व्हावी म्हणून आपला अट्टाहास म्हणजेच अध्यात्म होय .
                       वाटा अध्यात्म्याच्या
                   अध्यात्म्याच्या पहिला टप्प्यात  आपण ह्या जगात आल्या पासूनच आपल्या आजी आजोबा ,आई वडील वगैरे नातेवाईकांकडून रामायण ,महाभारत ,आटपाट नगर ,राजा राणी,सिंहासन बत्तीसी ,वेताळ-विक्रम सारख्या कथा ऐकत आलेलो असतो .  सृष्ट व दृष्ट शक्तिचा संघर्ष  व त्यातून सत्याचा अंतिम  विजय आपल्या मनाची पकड घेतो . कथा ऐकता ऐकता कथा संग्रह ,ग्रंथ यांचेही वाचन आपले चालूच असते . शिक्षणाच्या विविध पातळ्या वर मातृभाषा ,राज्यभाषा  व इतर अनेक भाषांचा  हीं आपण अभ्यास करीत असतो .श्रवण, कथन,वाचन या बरोबरच आता आपल्या मदतीस आकाशवाणी ,दूरदर्शन  आणि आतातर मालिका व चित्रपट ही आपल्या ज्ञानसागरात भर टाकीतच असतात.
                     
  पर्यटनातून  अध्यात्म,मनोरंजनातून पर्यटन , पर्यटनात  तीर्थक्षेत्रे ,बारा ज्योतिर्लिंगे , अष्टविनायक ,चार धाम ,देवी देवता  यांच्या भेटी व दर्शनातून आपण  अध्यात्म कळत न कळत  शिकत असतो .अध्यात्माचा हा प्रवाह अविरत चालू असतो.कीर्तन, भजन व प्रवचन ,अभंग,गाथा, गीता ,  ज्ञानेश्वरी , उपनिष  दे  ,रामायण सारखी पुस्तके मनाचा ताबा घेतात.आपला दिनक्रम ,स्नान,  संध्या ,देवपूजा यांनी व्यापून जातो .
                           एव्हाना तारुण्याची चाहूल लागलेली असते,ग्रहस्थाश्रमाच्या  ह्या टप्प्यात ज्ञानार्जन मागे पडते व अर्थार्जनाचा प्रवास सुरु होतो.मात्र ह्या काळात अध्यात्म ढेपाळते,मंदावते. आता आपण प्रपंच,मुलांचे संगोपन ,आई वडिलांची सेवा यात गुंतून पडतो .तरी हीं देव देवतांचा विसर पडतो असे मात्र होत नाही .सॅम वयस्क ,सॅम विचारी  समवेत हा प्रवास अविरत मार्गक्रमण करीत असतो .

                        
                 

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

आई दीवाली आई दिवाली

आज दीपावली का तीसरा दिन है। सभी वरिष्ठ नागरिक संत सावता मंदिर में स्थानापन्न हुए है । साने गुरूजी की प्रार्थना जगाला प्रेम अर्पावे के साथ सभा का प्रारभ होता है। हमारा गाव है तो देहात ही किन्तु यंहा दीपावली के दिन पान-सुपारी का आयोजन किया जाता है। हर मंदिर में जाकर पान -सुपारी रखते है। एक दुजेको पान-सुपारी देकर आलिंगन करते है। शुभ कामनाये करते है। फीर दीपावली उमंग हर्शौल्हास के साथ मनाते है.